राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विरोधक अनेक मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना घेरत आहेत. अशातच विरोधकांकडून भाजपावर कायम एक आरोप केला जातो की, इतर पक्षातील आरोप असलेल्या लोकांना भाजपात गेल्यावर क्लीनचिट दिली जाते. याच मुद्द्यावरून भाजपाचे आमदार रमेश पाटील यांनी आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे ती गुजरातमधून येते, असं वक्तव्य विधानपरिषदेत केल्याने एकच चर्चा रंगली आहे.